अंघोळीवर कोट्यावधीचा खर्च करते ही सौंदर्यवती


जगात श्रीमंत लोकांच्या विविध शौकाविषयी आपण अनेकदा ऐकतो. कुणाला महागड्या गाड्या, कुणाला बंगले, कुणाला शॉपिंग करायला आवडते तर मेदेवदेव सारखा एखादा बॉक्सर पैशांच्या गादीवर लोळण्यास प्राधान्य देतो. कुणी दागिने, सौंदर्यप्रसाधने, स्पा यावर अफाट खर्च करतात. कमालीया जहूर ही पॉपस्टार, ओपेरा सिंगर, अभिनेत्री आणि माजी मिसेस वर्ल्ड तिच्या लाइफस्टाइलमुळे चर्चेत आली आहे. ३९ वर्षीय कमालीया मॉडेलिंगही करते.

मिळालेल्या माहितीनुसार मुळची युक्रेन येथली ही सौंदर्यवती अंघोळीवर कोट्यवधी रुपये खर्च करते. ती स्नानासाठी शाम्पेनचा वापर करते आणि त्यासाठी अनेक बाटल्या खरेदी करते त्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतात. कलामिया विवाहित आहे. तिचे पती मुळचे पाकिस्तानी असून आता ब्रिटीश करोडपती आहेत. मोहम्मद जहूर असे त्यांचे नाव आहे. या जोडप्याला दोन जुळ्या मुली असून त्याची नवे अराबेला आणि मिराबेला अशी आहेत.


मोहमद जहूर यांनी युक्रेनमध्ये १९९० साली व्यवसाय सुरु केला तो चांगलाच फळफळला असून ते सध्या ब्रिटनमध्ये आहेत. कमालीया आणि मोहम्मद यांची १० घरे, खासगी जेट आणि ५० लाख युरो किमतीचे एक याच अशी मालमत्ता असून घरातील २२ नोकरांच्या पगारावर ते वर्षाला ११९४ कोटी रुपये खर्च करतात. कमालीया हिला हिऱ्यांची घड्याळे अति प्रिय आहेत. तिच्या एका घड्याळाची किंमत ४० लाख रुपये तर चष्मा ४ लाख रुपये किमतीचा आहे. मुलींच्या जन्माच्यावेळी तिने करियर मधून ब्रेक घेतला होता पण आता ती पुन्हा जोमाने तिच्या आवडीच्या क्षेत्रात उतरली आहे.