पंतप्रधान मोदींना मिळालेल्या 2700 भेटवस्तूंचा होणार लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी देश-विदेशातून अनेक भेटवस्तू मिळत असतात. मोदी जेव्हा विदेश दौरे करतात तेव्हा त्या देशातील राष्ट्र प्रमुखांकडून त्यांना काहींना काही भेटवस्तू मिळत असते. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या याच भेटवस्तूंचा आता लिलाव होणार आहे.

सांगण्यात येत आहे की, पंतप्रधान मोदींना मिळालेल्या 2700 भेटवस्तूंचा 14 सप्टेंबर रोजी ऑनलाइन लिलाव केला जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधानांना मिळालेल्या 2772 भेटवस्तूंचा ऑनलाइन लिलाव केला जाइल. या वस्तूंची कमीत कमी मूल्य 200 रूपये आहे तर सर्वाधिक मुल्य अडीच लाखांपर्यंत आहे.

या वर्षीच्या जानेवारीमध्ये देखील मोदींना मिळालेल्या 1800 वस्तूंची विक्री करण्यात आली होती. लिलावातून मिळणाऱ्या रक्कमेला नमामि गंगे प्रोजेक्टमध्ये दान केले जाईल.

 

Leave a Comment