हेल्मेट घातल्यावरही होऊ शकते कारवाई, हा आहे नियम

1 सप्टेंबरपासून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. या नियमांमध्ये हेल्मेट परिधान करणे सक्तीचे आहे. मात्र जर तुम्ही हलक्या दर्जाचे हेल्मेट खरेदी केले असेल तर आताच बदलून घ्या. कारण जर तुमच्या हेल्मेटवर आयएसआय मार्क नसेल तर तुमचे चलान कापले जाऊ शकते. दिल्लीमध्ये यासाठी दंड आकारला जात आहे.

दिल्लीमध्ये रस्त्याच्या कडेला अगदी 200-300 रूपयांमध्ये हेल्मेट मिळत आहेत. हलक्या दर्जाचे हेल्मेट सुरक्षा करू शकत नाहीत. त्यामुळे आयएसआय होलमार्क असलेले हेल्मेट परिधान करणे गरजेचे आहे. स्वस्त हेल्मेट घेण्याकडे नागरिकांचा कल आहे. स्वस्त हेल्मेटच्या नादात नागरिक बनावट हेल्मेट खरेदी करत आहेत.

आयएसआय होलमार्क असणाऱ्या हेल्मेटची किंमत 400 रूपयांपासून सुरू आहे. बनावट हेल्मेट डोक्याची सुरक्षा करू शकत नाही. यामुळे अपघात झालातर मोठी किंमत चुकवावी लागू शकते.

Leave a Comment