शेकडो बंदुकींचा मालक नाव आहे ‘ड्रॅगन मॅन’

सर्वसाधारणपणे लोक सुरक्षेच्या कारणास्तव दोन-चार बंदुका घरात ठेवत असतात. मात्र अमेरिकेतील एका व्यक्तीला बंदुकीचे ऐवढे वेड आहे की, या माणसांकडे साठाच आहे. हा झोपतो देखील बंदुकांबरोबरच.

74 वर्षांच्या या व्यक्तीचे नाव मेल बर्न्सटीन आहे. या व्यक्तीने संपुर्ण आयुष्य बंदुकीत घातले आहे. त्यांच्याकडे 200 पेक्षा जास्त मशीन गन, शेकडो बंदुका, 80 पेक्षा जास्त आर्मर्ड गाड्या आणि असंख्य ग्रॅनेड लाँचर आहेत.

(Source)

न्युयॉर्कच्या ब्रोकोलिनमध्ये राहणाऱ्या बर्न्सटीनमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीला बंदुकींचे एवढे वेड आहे की, त्यांच्या बेडरूममधील भिंतीवर देखील बंदुका लावलेल्या आहेत. संपुर्ण अमेरिकामध्ये सर्वात जास्त शस्त्र बर्न्सटीनकडेच आहे. त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीच्या किंमती अब्ज रूपये आहे.

(Source)

बर्न्सटीनच्या कलेक्शनमध्ये प्रथम विश्वयुध्द आणि व्हिएतनाम युध्दामध्ये वापरण्यात आलेल्या बंदुकांचा देखील समावेश आहे. याचबरोबर त्यांच्याकडे द्वितीय विश्वयुध्दात वापरण्यात आलेला बंकर देखील आहे.

(Source)

बर्न्सटीनला ड्रॅगन मॅन नावाने देखील ओळखले जाते. हे नाव त्यांना 1970 साली मिळाले. बर्न्सटीनने हार्ले डेव्हिडसन बाइकच्या मागे एक ड्रॅगन लावला होता. तेव्हापासूनच त्यांना हे नाव मिळाले.

(Source)

कोलोराडोच्या ई पासो काउंटी येथे त्यांचे 20 एकरमध्ये ड्रॅगन लँड देखील आहे. या ड्रॅगन लँडमध्ये असलेले सैन्य संग्रहालयाला बघायला रोज शेकडो लोक येतात. जगातील अशी एखादीच बंदुक असेल जी बर्न्सटीन यांच्याकडे नसेल.

Leave a Comment