पाकिस्तानात दूध पेट्रोल पेक्षाही महाग, 140 रुपयांना मिळत आहे 1 लीटर

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या पुर्णपणे रसातळाला गेली आहे. कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानात महागाई, बेरोजगारी वाढली असून पाणी, वीज, चांगले रस्ते यासारख्या मुलभूत गोष्टी देखील तेथील नागरिकांना मिळेना झाल्या आहेत. पाकिस्तानातील नागरिक दुधासाठी देखील तरसले आहेत. मोहरमच्या दिवशी पाकमध्ये दुधाचा भाव हा पेट्रोल पेक्षाही अधिक होता. कराची आणि सिंध येथे एक लीटर दूध 140 रूपयांना विकले जात होते.

रिपोर्टनुसार, मोहरमच्या दिवशी कराचीमध्ये एक लीटर दुधाचा भाव 120 ते 140 होता तर सिंधमध्ये 140 रूपये एवढा होता. पाकिस्तानमध्ये दूध पेट्रोलच्या भावापेक्षाही अधिक किंमतींना विकले जात आहे. पेट्रोलसाठी लोक 93 रूपये देत आहेत तर दुधासाठी 140 रूपये देत आहेत. दुकानदारांचे म्हणणे आहे की, दुधाची मागणी वाढल्याने भाव वाढले आहेत. कमिश्नर ऑफिसकडून अधिकृतरित्या एक लिटर दुधाची किंमत 94 रूपये निश्चित करण्यात आलेली आहे.

अर्थव्यवस्था ढासळल्याने मुलभूत गोष्टींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कांदे आणि टमाटरचे भाव देखील पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

 

Leave a Comment