या राज्यात 90 % कमी झाली वाहतुक दंडाची रक्कम

1 सप्टेंबरपासून मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहतुकीच्या दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. मात्र 10 दिवसाच्या आतच गुजरात सरकारकडून दंडाच्या रक्कमेत बदल केले आहेत. गुजरात सरकारने दंडाची रक्कम 25 ते 90 टक्के कमी केली आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी याबद्दलची घोषणा केली आहे. गुजरातनंतर आता इतर राज्यांमधील दंडाची रक्कम देखील कमी होण्याची शक्यता आहे. मोटार वाहन कायद्यांतर्गत प्रत्येक राज्याला दंडाची रक्कम किती ठेवायची याचा अधिकार आहे.

मात्र गुजरात सरकारने दारू पिऊन गाडी चालवणे आणि सिग्नल तोडणे या दंडाच्या रक्कमेत बदल केलेले नाहीत.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी म्हणाले की, लोकांकडून दंड वसूल करणे हा आमचा उद्देश नाही. नवीन कायदा कठोर शिक्षा दिल्याशिवाय लागू करणे शक्य नाही.  आम्ही मानवीय दृष्टीकोनातून दंडाची रक्कम कमी करत आहोत. जे वारंवार नियम तोडताना त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

नवीन नियमांनुसार विना हेल्मेट अथवा सीट बेल्ट न लावता गाडी चालवण्यावर 1000 रूपये दंड आहे. मात्र गुजरातमध्ये 500 रूपये दंड भरावा लागेल. रूग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास 10 हजारांची जागी 1000 रूपये, दुचाकीवर ट्रिपल सीटसाठी 1000 च्या जागी 100 रूपये दंड करण्यात आलेला आहे.

 

Leave a Comment