गिलगिट-बाल्टिस्तान भारताचा हिस्सा, 70 वर्षांपासून पाकिस्तानचा खोडसाळपणा – सेरिंग

जिन्हिवा येथील युएनएचआरसीच्या 42 व्या सत्रात गिलगित-बाल्टिस्तानचे सामजिक कार्यकर्ते सेंज सेरिंगने गिलगित-बाल्टिस्तान हा भारताचा हिस्सा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, गिलगित-बाल्टिस्तान भारताचा हिस्सा असून, संयुक्त राष्ट्राला समजायला हवे की, पाकिस्तान मागील 70 वर्षांपासून एक मोठा अडथळा ठरत आहे.

सेंज सेरिंगने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. सेरिंग म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 काही लोकांच्या हाताचे खेळणे झाले होते. ज्या लोकांना याचा फायदा होत होता. ते पाकिस्तानी सैन्याचे सहयोगी होती आणि पाकिस्तानच्या राजकीय हिताचा जम्मू-काश्मीरमध्ये प्रचार करत होते.

भारतीय वायूदलाने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राइकद्वारे 200 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यावेळी देखील सेंज सेरिंगने व्हिडीओ शेअर करत योग्य झाल्याचे म्हटले होते. पाकिस्तान या घटनेचे सत्य लपवत असल्याचे सेरिंग म्हणाले होते.

 

Leave a Comment