या ड्रायव्हरने लावला 20 लाख लोकांना 14,800 कोटींचा चूना

सहकार क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या आदर्श क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी घोटाळ्यात विशेष मोहिम दलाने 20 पानांची चार्जशिट सादर केली आहे. या चार्जशीटमध्ये धक्कादायक सत्य समोर आले आहे.

एकेकाळी टॅक्सी ड्रायव्हर आणि कॅसेट रेकॉर्डिंग करणाऱ्या विरेंद्र मोदीने भाऊ मुकेश आणि भरतबरोबर मिळून तब्बल 28 राज्यांमध्ये आदर्श सोसायटीच्या 806 शाखा सुरू केल्या. यामध्ये कुटुंबातील 11 लोकांबरोबरच ड्रायव्हर आणि नोकरांना देखील डायरेक्टर बनवले. दुप्पट पैसे देतो असे सांगत तब्बल 20 लाख लोकांना 14,800 करोड रूपयांना चुना लावला आहे. गुंतवणूक दारांचे 12,414 करोड रूपये नातेवाईक आणि नोकरांच्या खोट्या कंपन्यांमध्ये गुंतवले.

एसओजीने 6 महिन्यांच्या तपासानंतर मोदी कुटुंबातील 11 सदस्य व अन्य तीन लोकांना अटक केली आहे. यामध्ये विरेंद्र मोदी, मुकेश मोदी, भरत मोदी, राहुल मोदी, समीर मोदी, रोहित मोदी, प्रियंका मोदी, वैभव लोढा यांना अटक करण्यात आलेले आहे.

विरेंद्र आणि मुकेश मोदी यांनी 1999 मध्ये सर्वात प्रथम सिरोही येथे आदर्श सोसायटीची शाखा सुरू केली. 4 वर्षात राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये 309 शाखा सुरू केल्या. 2012 पर्यंत या शाखांमध्ये वाढ होऊन आकडा 806 वर गेला.  नोटबंदीच्या काळात देखील या शाखांमधून 223 करोड रूपये बदलण्यात आले.

जुलै 2018 मध्ये एसओजीला तक्रार मिळाली होती. त्यानंतर 6 महिने तपास केल्यानंतर समजले की, सोसायटीने 20 लाख गुंतवणूकदारांचे पैसे 806 शाखांमध्ये गुंतवले असून, यामधील 14800 रूपयांना चुना लावला आहे.

Leave a Comment