कॅशलेसच्या काळात महिलेने मंदिरात दान केले सव्वा करोड रूपये रोख

राजस्थानमधील चित्तौडगड येथील सांवलिया सेठ दरबारात एका महिलेने केलेले दान सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या महिलेने या मंदिरात सव्वा करोड रूपये दान केले आहेत. विशेष म्हणजे ही रक्कम तिने कॅश अर्थात रोख दान केली आहे. कॅशलेस इंडियाच्या काळात अशाप्रकारे करोडो रूपये रोख दान केल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.

जलझुलनी मेळा सुरू असतानाच एका महिला श्रध्दाळूने मंदिरात येत, सांवराचे दर्शन घेत बँगमध्ये एक एक रोख रक्कमेची पॉकिट काढत दानपेटीत टाकण्यास सुरूवात केली. जवळपास 50 पेक्षा अधिक पॉकिटांमधील रोख रक्कम महिलेने दानपेटीत टाकली.

ही महिला कोण होती हे अद्याप समजू शकले नाही. मात्र की इंदौरची असल्याचे सांगितले जात आहे. या महिलेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भगवान श्री सांवलिया सेठ यांचा संबंध मीराबाई यांच्याशी सांगितला जातो. व्यापारी जगतात हे मंदिर खूप प्रसिध्द आहे. व्यापाऱ्यांना उद्योगात नफा झाल्यास ते मोठ्या प्रमाणात येथे येऊन दान करतात.

Leave a Comment