नेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी अ‍ॅपलकडून टिव्ही प्लस सेवा लाँच

अ‍ॅपल कंपनीने काल झालेल्या इव्हेंटमध्ये आयफोन 11 सीरिज आणि आयपॅड (10.2) लाँच केले. मात्र याचबरोबर कंपनीने अ‍ॅपल टिव्ही प्लस या ऑनलाइन स्ट्रिमिंग सेवेची देखील घोषणा केली आहे.

अ‍ॅपल टिव्ही प्लस या  स्ट्रिमिंग सेवेसाठी भारतात दर महिन्याला 99 रूपये भरावे लागणार आहेत. 1 नोव्हेंबर पासून ही सेवा 100 देशांमध्ये सुरू होणार आहे. अ‍ॅपल टिव्ही प्लस सेवा ही आयफोन, आयपॅड, अ‍ॅपल टिव्ही, आयपॅड टच आणि मॅकमध्ये उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे नव्याने जर या गोष्टींची खरेदी केली तर 1 वर्षांसाठी अ‍ॅपल टिव्ही प्लस सेवा मोफत पाहता येणार आहे. यामध्ये तुम्हाला द मॉर्निंग शो, डिकिन्स, फॉर ऑल मॅनकाइंड या सारखे सीरीज आणि चित्रपट पाहता येणार आहेत.

 

Leave a Comment