सैनिकांच्या गणवेशापासून सुंदर खुर्च्या बनविणारा वल्ली


जगात असे अनेक कसबी कारागीर आहेत ज्यांची कारागिरी पाहून नवलाने बोट तोंडात जाते. ब्रिटन मधील डॉगी स्मिथ याची कारागिरी मात्र फारच वेगळी आणि कौशल्यपूर्ण आहे. स्मिथ खुर्च्या बनवितो. आता असे वाटू शकेल की खुर्च्यात काय विशेष कारागिरी असणार? पण या खुर्च्या खरोखरच अफलातून आहेत कारण त्या सैनिकांच्या जुन्या गणवेशातून बनविल्या जातात. गेली ३० वर्षे स्मिथ हे काम करतो आहे आणि त्याच्या या खुर्च्या खुपच लोकप्रिय झाल्या आहेत.

स्मिथने या खुर्च्यांना आर्मी खुर्ची असेच नाव दिले आहे. स्मिथ ब्रिटनच्या साफ्रोन वाल्डेन येथे राहतो. तो सांगतो संपूर्ण ब्रिटनमधून त्याच्याकडे खुर्ची बनवून देण्याची मागणी आहे. त्यातही जे सैनिक शहीद झाले आहेत त्यांचे कुटुंबीय अधिक प्रमाणात आहेत. आपल्या शहीद जिवलगाची आठवण जागी ठेवण्याचा हा एक मार्ग अशी त्यांची भावना त्यामागे असते. तो म्हणतो नुकतीच त्याने आरएएफ विंग कमांडर फ्लाईट स्क्वाड्रन लीडर्ससाठी अश्या ८ खुर्च्या बनवून दिल्या आहेत.


स्मिथच्या मते त्याला त्याच्या या कलेचे सर्वाधिक समाधान आणि सन्मान दिला तो बेन पार्किन्सनच्या गणवेशापासून त्याने खुर्ची बनविली तेव्हा. ही खुर्ची त्याने बेनला भेट दिली. तो म्हणतो बेन ब्रिटनचा बहादूर सैनिक आहे. स्मिथ लहानपणापासून हे काम करतो आहे. त्याची ही कारागिरी पाहून लांबलांबून लोक त्याच्याकडे येतात. माझे हे काम लोकांना इतके आवडेल अशी अपेक्षा केली नव्हती असे स्मिथ सांगतो.

Leave a Comment