ट्रेंड होतोय बाहुबली डोसा


गेले काही दिवस ओरिसाच्या भुवनेश्वकर मधील चंद्रशेखरपूर येथील एका रेस्टॉरंटमध्ये बनत असलेला बाहुबली डोसा सोशल मिडीयावर ट्रेंड होत असून या डोश्याने रेकॉर्ड बनविले आहे. प्रत्येक रेस्टॉरंट त्यांच्या परीने ग्राहकांना खास आकर्षण वाटावे आणि ग्राहक संख्या वाढावी यासाठी काही खास पदार्थ बनवत असतात. दाक्षिणात्य खाद्यपदार्थात इडली, डोसा हे प्रमुख पदार्थ जगभर लोकप्रिय आहेत. पण ओडीसाच्या बाहुबली डोसा या स्ट्रीटफूड कॅटेगरीत मोडणाऱ्या रेस्टॉरंटने डोसाच पण त्याला एकदम नवीन रुपात पेश केले आहे.


हा नेहमीच्या डोश्यासारखा डोसा आहे फक्त याचा आकार भलामोठा आहे. या डोश्याची लांबी ४ फुट असून त्यासोबत बटाटा भाजी, कांदा, सांबर, चटणी दिली जाते. हा डोसा चार जणांना पोटभर होतो. इतके असूनही त्यांची किंमत फक्त ७५ रुपये आहे. दीड वर्षापूर्वी हा डोसा बनविण्याची सुरवात झाली मात्र आता तो अधिक प्रकाशात आला आहे. सोशल मिडियावर तो ट्रेंड होतो आहेच पण सर्वाधिक लांबीचा डोसा म्हणून त्याने रेकॉर्ड बनविले आहे.

Leave a Comment