गांजा ओढण्यात न्युयॉर्कवासीय जगात आघाडीवर


जर्मन कंपनी एबीसीडी ने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कंपनीने केलेल्या संशोधनात ग्लोबल वीड इंडेक्स (जागतिक गांजा आकडेवारी)नुसार न्युयॉर्कवासीय सर्वाधिक गांजा ओढतात असे दिसून आले आहे. ही कंपनी विविध प्रकारचे डेटा गोळा करण्याचे काम करते. आकडेवारीनुसार न्युयॉर्क मध्ये दरवर्षी ७७.४ टन गांजा खपतो.

भारतात अमली पदार्थ विक्री, वापरावर बंदी असली तरीही भारत ग्लोबल वीड इंडेक्स मध्ये असून भारताची राजधानी दिल्ली तीन नंबरवर तर आर्थिक राजधानी मुंबई ६ नंबरवर आहे. दिल्लीत २०१८ मध्ये ३८.८ टन गांजा वापरला गेला आहे तर मुंबईत हेच प्रमाण ३२.४ टन आहे. दिल्लीत १ ग्रॅम गांजासाठी ३१५ रुपये तर मुमाबित ३२८ रुपये मोजावे लागतात असे समजते.

ग्लोबल वीड इंडेक्स मध्ये पाकिस्तानचे कराची दोन नंबरवर आहे तेथे दरवर्षी ४२ टन गांजा खपतो. या यादीत १२० शहरे आहेत. त्यात लॉस एंजेलिस, शिकागो यांचाही समावेश आहे. जगात खुपच कमी देशांनी गाजाला कायदेशीर मान्यता दिली असून त्यात टोरांटोचा समावेश आहे. विशेष म्हणजे गांजाचा स्वर्ग मानल्या जाणाऱ्या अॅमस्टरडॅमचा या यादीत ५६ वा नंबर असून तेथे ३.६ टन गांजा वापरला गेल्याचे दिसून आले आहे. जगात सर्वाधिक महाग गांजा जपानच्या टोक्योमध्ये विकला जातो. येथे १ ग्रॅम गांजासाठी २३४८ रुपये मोजावे लागतात.

Leave a Comment