उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसला रामराम

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र पाचच महिन्याच्या आत उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षांतर्गत कुरूबुरींना कंटाळून हा राजीनामा देण्यात आला आहे.

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांना पाठवलेल्या पत्रावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. पत्रामध्ये उर्मिला यांनी म्हटले आहे की, मुंबई मधील काही नेत्यांना त्यांच्या कृत्याबद्दल जबाबदार धरण्याऐवजी त्यांना नवीन पदे दिली जात आहेत. याच कारणामुळे तिने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

उर्मिला  यांनी म्हटले आहे की, पक्षांतर्गत राजकारणासाठी मला स्वत:चा वापर होऊ द्यायचा नाही. त्यामुळे मी राजीनामा देत आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेच्या तिकीटावर उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र तिला भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याकडून तब्बल 4.6 लाखांनी पराभव स्विकारावा लागला होता.

Leave a Comment