शाहरुखचा ब्राव्होसोबत ‘लुंगी डान्स’, व्हिडीओ व्हायरल

अभिनेता शाहरूख खानची मालकी असलेला ट्रिनबागो नाइट रायडर्स संघ सध्या कॅरेबियन प्रिमिअर लीगमध्ये खेळत आहे. कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली या संघाने लीगमध्ये तीन मोठे सामने जिंकले. संघाच्या या कामगिरीनंतर शाहरूख आणि बाकी सदस्यांना पार्टी करण्यासाठी एक चांगलीच संधी मिळाली.

शाहरूख आणि क्रिकेटपटू ड्वेन ब्रावो प्रायव्हेट बोटवर पार्टी करत आहे. ड्वेन ब्रावोने या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका व्हिडीओमध्ये तर हे दोघेजण बॉलीवुडचे सुपरहीट गाणे लुंगी डान्सवर नाचत आहेत. दोघांचा लुंगी डान्सवर नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ड्वेन ब्रावोने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सर्व खेळाडू सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. तर या खेळाडूंबरोबर अभिनेता शाहरूख खान देखील डान्स करत आहे.

 

 

Leave a Comment