पत्नीला झोपता यावे म्हणून हा पठ्ठ्या विमानात राहिला 6 तास उभा

सोशल मीडियावर सध्या एक फोटो भलताच व्हायरल होत आहे. बघणारा प्रत्येक जण हा फोटो बघून हैराण होत आहे. सोशल मीडियावर देखील या फोटो संदर्भात युजर्स दोन गटात विभागले गेले आहेत.

फोटो शेअर करत लिहिण्यात आले आहे की, पत्नीला विमानात झोपता यावा यासाठी एक व्यक्ती तब्बल 6 तास विमानात उभा होता. या फोटो हे आहे खरे प्रेम असे म्हणत शेअर करण्यात येत आहे. मात्र हा फोटो किती खरा याबाबतची अद्याप पुष्टी झालेली नाही.

फोटोमध्ये दिसत आहे की, महिला सीटवर झोपली असून, तिच्या बाजूला एक व्यक्ती उभा आहे. फोटो शेअर करणाऱ्या युजरने लिहिले आहे की, हा व्यक्ती पत्नीला विमानात झोपता यावे यासाठी 6 तास उभा आहे. हे आहे खरे प्रेम.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या. काहींनी ही क्रुरता आहे असे म्हटले तर काहींनी खरे प्रेम आहे असे म्हटले. अनेक युजर्सनी हा फोटो फेक असल्याचे देखील म्हटले आहे.

एका युजरने लिहिले की, हे विमान काय ह्यांच्या मालकीचे आहे का ? क्रु मेंबर्सने कारवाई का केली नाही. असा काही नियम नाही की, कोणताही प्रवासी उभा राहून प्रवास करेल. हा फोटो फेक आहे.

नेटिझन्स या फोटोची सत्यता तपासण्याची मागणी करत आहे. हा फोटो खरा की फेक याबाबतची अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

Leave a Comment