9 हजारच्या चलानसाठी त्याने खर्च केले 27 लाख रूपये

इंग्लंडच्या वॉरसेटर येथील एका व्यक्तीने 9 हजार रूपयांच्या चलानासाठी कायदेशीर लढाईमध्ये तब्बल 27 लाख रूपये खर्च करण्याची घटना घडली आहे. तीन वर्षांपुर्वी 71 वर्षीय रिसर्च किडवेल यांना एक नोटीस आली. यामध्ये 8,858 (100 पाउंड) रूपयांचे चलान होते. त्यांच्यावर ताशी 48 किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याच्या झोनमध्ये ताशी 56 किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याचा आरोप होता. मात्र रिचर्ड यांना विश्वास होता की, त्यांनी वेगाने गाडी चालवलेली नाही.

रिचर्ड यांनी या नोटिशी विरोधात तीन वर्ष कायदेशीर लढाई लढली व यासाठी त्यांचे तब्बल 27 लाख रूपये खर्च झाले. यामधील 18 लाख रूपये वकिलांची फी व कोर्टाचा खर्च यांचा समावेश आहे.

निवृत्त इंजिनिअर किटवेल यांनी दावा केला आहे की, नोव्हेंबर 2016 मध्ये त्यांनी न्यू रोडवर गाडीचा वेग ताशी 48 किमी पेक्षा अधिक ठेवला नव्हता. न्यायालयात इलेक्ट्रॉनिक्स तज्ञांनी सांगितले की, बाजूने चालणाऱ्या गाडीच्या कॅमेरेने हे रेकॉर्ड केले आहे. मात्र रेकॉर्डिंगमध्ये चुकी होऊ शकते.

वॉरसेटर मॅजिस्ट्रेट न्यायालयात केस हरल्यानंतर त्यांनी क्राउन न्यायालयात धाव घेतली. किडवेल यांनी सांगितले की, आता निर्णय काहीही आला तरी त्यांनी या केससाठी मोठी रक्कम खर्च केली आहे. कुटुंबातील सदस्य देखील म्हणतात की, ही केस खूपच अवघड झाली आहे.

 

Leave a Comment