1300 लोकांच्या कार्डची माहिती लक्षात ठेवत लोकांना घातला लाखोंचा गंडा

जापानमधील एका क्लार्कने तब्बल 1300 लोकांच्या क्रेडिट कार्डचे नंबर लक्षात ठेऊन पैसे उडवले आहेत. 34 वर्षीय युसूके तानीगुचीला कार्डची माहिती चोरून त्याचा वापर केल्याने अटक करण्यात आली आहे. तानीगुची हा कोटो सिटीमधील एका शॉपिंग मॉलमध्ये पार्ट टाइम क्लार्कची नोकरी करायचा व त्यावेळी ग्राहकांच्या कार्डाचे नंबर लक्षात ठेवायचा.फोटोग्राफीक मेमरीमुळे त्याला हे नंबर सहज लक्षात राहत असे.

फोटोग्राफीक मेमरीमुळे एकदा बघितलेली गोष्ट लगेच लक्षात राहते. तानीगुची देखील असेच करायचा व नंतर ते नंबर एका वहीत लिहून काढायचा. पोलिसांनी सांगितले की, या फोटोग्राफीक मेमरीच्या जोरावर तानीगुची ग्राहकांचे कार्डावरील नाव, नंबर, एक्सापयरी डेट आणि सिक्युरिटी कोड देखील लक्षात ठेवायचा. या माहितीचा वापर करून तो ऑनलाइन शॉपिंग करायचा. अशाच एका शॉपिंगच्या डिलिव्हरीच्या वेळेस तो पकडला गेला. पोलिसांनी आधीच डिलिव्हरी करणाऱ्यांना एखादी मोठ्या प्रोडक्टची डिलिव्हरी असेल तर त्यांना सांगण्यास सांगितले होते.

पोलिसांना त्याच्या घरात मिळालेल्या डायरीमध्ये हजारो लोकांच्या कार्ड्सची माहिती मिळाली.  याद्वारे त्याने आतापर्यंत किती लाखांची शॉपिंग केली आहे याची माहिती मिळेल.