शास्री बुवांच्या पगारात इतक्या कोटींची वाढ

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्री यांची काही दिवसांपुर्वीच फेरनियुक्ती करण्यात आली. 2021 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकापर्यंत त्यांचा करार असणार आहे. मात्र आता शास्री यांच्या पगारात देखील भरघोस वाढ करण्यात आली आहे.

या आधी रवी शास्री यांचा वार्षिक पगार हा 8 कोटी होता. मात्र यामध्ये तब्बल 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता त्यांचा वार्षिक पगार तब्बल 10 कोटी झाला आहे.

रवी शास्री यांच्याबरोबरच अन्य स्टाफ मेंबर्सच्या पगारात देखील घसघशीत वाढ झाली आहे. बॉलिंग कोच भरत अरूण आणि फिल्डिंग कोच आर श्रीधर यांना प्रत्येकी 3.5 कोटी रूपये पगार देण्यात येणार आहे. तर विक्रम राठोड यांना 2.5 ते 3 कोटी दरम्यान पगार देण्यात येणार आहे.

रवी शास्री हे 2007 मध्ये भारतीय संघाचे मॅनेजर होते. 2014 ते 2016 या काळात ते संघाच्या डायरेक्टर या भूमिकेत देखील होते. त्यानंतर 2017 मध्ये त्यांची भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली होती.

रवी शास्री यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने कसोटी रँकिंगमध्ये सर्वाच्च स्थान देखील गाठले होते. तसेच 2017 चॅम्पियन ट्रॉफीमध्ये फायनलपर्यंत आणि 2019 च्या विश्वचषकात सेमी फायनलपर्यंत भारतीय संघाने मजल मारली होती.

 

Leave a Comment