Video : या कुत्र्याच्या करामतीमुळे नेटकरी हैराण

सध्या एका कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या कुत्र्याला सर्वोत्तम अभियनयाचा पुरस्कार देखील देण्यात यावा असेही नेटकऱ्यांकडून म्हटले जात आहे. याचे कारणही तसेच खास आहे. या कुत्र्याची मालकीन त्याची नखे कापत असताना, कुत्र्याने असा काही अभिनय केला की, सर्वच पाहत राहिले.

मुलगी नेल कटरने कुत्र्याची नखे कापायला जाते, मात्र त्याआधीच कुत्रा बेशुध्द झाल्याचे नाटक करतो. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की, कुत्रा मुलीकडे दुर्लक्ष करत आहे. मुलगी नेल कटरने नखे कापण्यास सुरूवात करताच, कुत्रा स्लो मोशनमध्ये बेशुध्द पडल्याचे नाटक करतो. पाय वर करून कुत्रा उलटा पडतो.

तीन दिवसांपुर्वी हा व्हिडीओ रेड्डिटवर अपलोड करण्यात आला होता. ट्विटरवर शेअर केल्यानंतर या व्हिडीओला आतापर्यंत 5 मिलियनपेक्षा अधिक व्यूज आले आहेत. याचबरोबर हजारो कमेंट्स देखील आल्या आहेत.

 

Leave a Comment