विक्रम लँडर संदर्भातील नागपूर पोलिसांचे भन्नाट ट्विट व्हायरल

चांद्रयान 2 मिशनमधील विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. मात्र ऑर्बिटरने फोटो पाठवत लँडर व्यवस्थित स्पष्ट केले. इस्रोमार्फत देखील मागील तीन दिवसांपासून लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांचे एक ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे. नागपूर पोलिसांनी ट्विट केले की, डिअर विक्रम, कृपया उत्तर दे. सिग्नल तोडल्यामुळे आम्ही तुझे चलान कापणार नाही.

नागपूर पोलिसांनी विक्रम लँडर संदर्भात केलेले ही ट्विट चांगलेच व्हायरल झाले. या ट्विटला आतापर्यंत 66 हजार लाइक आले असून, हजारो कमेंट्स देखील आल्या आहेत.

एका युजरने लिहिले की, मला माहिती आहे, नागपूर पोलिस चंद्रावर आहेत. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘ग्रेट सेंस ऑफ ह्यूमर’. नागपूर पोलिसांनी केलेले हे ट्विट नेटकऱ्यांना भलतेच आवडले.

 

Leave a Comment