यो यो फिटनेस टेस्ट आणखी कठीण करणार – रवी शास्री

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्री खेळाडूंच्या फिटनेसबद्दल मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा प्रशिक्षक पदाची जबाबदारी संभाळणारे शास्री यो-यो टेस्ट क्वालिफाइंग स्कोर 16.1 च्या जागी 17 करण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयने याआधीच जाहीर केले आहे की, संघात स्थान मिळवण्यासाठी यो-यो पास करणे गरजेचे आहे. सध्या यो-यो टेस्टमध्ये पास होण्यासाठी 16.1 अंक मिळवणे गरजेचे आहे. मात्र आता यात बदल होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात रवी शास्री लवकरच संबंधीत लोकांची मिटिंग घेणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी फिटनेसला अधिक महत्त्व दिले जात आहे. आता यो-यो टेस्टमध्ये क्वालिफिकेशनसाठी 17 अंक गरजेचे आहे. 15 सप्टेंबरपासून दक्षिण अफ्रिकेबरोबर सुरू होणाऱ्या मालिके आधी हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

यो-यो टेस्ट काय आहे ?

यो-यो टेस्ट ही एक एरोबिक एक्सरसाइज आहे. ही टेस्ट डेनमार्क फुटबॉलचे फिजियोथेरेपिस्ट जेन्स बँग्स्बोने विकसित केले आहे. यासाठी 20 मीटरच्या दोन रेषा आखण्यात येतात. या रेषेत खेळाडूंना धावावे लागते. धावाताना बीप वाजल्यावर परत फिरावे लागते. प्रत्येक एक मिनिटाने बीप वाजण्याचे अंतर वाढते. ठरलेल्या वेळेत रेषेपर्यंत न पोहचल्यास बीप अजून लवकर वाजू लागते.

 

Leave a Comment