चुकून मिळालेले 86 लाख या जोडप्याने केले खर्च

अमेरिकेच्या मोंटूर्सविले येथे राहणाऱ्या रॉबर्ट आणि टिफनी विलियम्स या दाम्पत्यांच्या खात्यात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी चुकीने तब्बल 86.29 लाख रूपये जमा केले. विशेष म्हणजे या नवरा-बायकोनने यातील तब्बल 76.90 लाख रूपये खर्च देखील केले. लिकिमिंग जिल्हा कोर्टात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार या दोघांवर चोरीचा आरोप करण्यात आलेला आहे.

सोमवारी या केसची पहिली सुनवाई झाली. यावेळी दोघांनी ही मान्य केले की, पैसे त्यांचे नव्हते. मात्र त्याची मोठी रक्कम त्यांनी खर्च केली आहे आणि हे पैसे ते त्वरित परत करू शकत नाही. पुढील सुनावाई पर्यंत दोघांना 18 लाख रूपयांच्या जामिनावर सोडण्यात आले आहे.

त्यांनी सांगितले की, ही रक्कम एसयुव्ही, कॅम्पर, दोन चारचाकी गाड्या, एक कार ट्रेलर घेतले. याचबरोबर काही रक्कम बिल भरण्यास वापरली तर एका मित्राला 15 हजार डॉलर उधारी म्हणून दिली. पैशांची उधळपट्टी केल्याने आता त्यांच्याकडे पैसे देखील शिल्लक राहिलेले नाहीत.

 

 

Leave a Comment