3 लाख कोटींचे मालक जॅक मा निवृत्त

चीनच्या अलिबाबा ग्रुपचे चेअरमन जॅक मा यांनी वयाच्या 55 व्या वर्षी निवृत्ती घेतली आहे. त्यांनी सीईओ डेनियल झांग यांच्याकडे जबाबदारी सोपवली. जॅक मा यांनी निवृत्तीची घोषणा मागील वर्षीच केली होती. जॅक मा आता शिक्षण आणि लोकांना मदत करण्यासारख्या कामात सहभागी होणार आहेत.

1999 मध्ये अलिबाब ग्रुपची सुरूवात करण्याआधी ते इंग्रजीचे शिक्षक होते. निवृत्तीसाठी त्यांनी आपला जन्मदिवस आणि शिक्षक दिनाची निवड केली होती. आज जॅक मा यांचा जन्मदिवस असून, चीनमध्ये 10 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. जॅक मा पुढील वर्षीपर्यंत कंपनीशी सल्लागार म्हणून जोडलेले असतील.

मागील वर्षी झालेल्या शंघाई येथील वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलीजेंस कॉन्फ्रंसमध्ये जॅक मा म्हणाले होते की, पुढील 10 ते 20 वर्षात प्रत्येक व्यक्तीने, देशाने आणि सरकारने शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी लक्ष्य देणे गरजेचे आहे. जॅक मायांच्या फाउंडेशनने ग्रामीण भागात प्रतिभावान शिक्षकांना शोधण्यासाठी 2017 मध्ये 4.5 करोड डॉलरची मदत केली होती.

जॅक मा यांची संपत्ती तब्बल 3 लाख करोड रूपये असून, ते जगातील श्रीमंताच्या यादीत 20 व्या स्थानावर आहेत. ते चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

 

Leave a Comment