फ्लिपकार्टने देशातील २७ हजार किराणा दुकाने नेटवर्कने जोडली


वॉलमार्टची मालकी असलेली ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आगामी सणासुदीचा मोसम लक्षात घेऊन त्यांच्या सप्लाय चेन मजबूत बनवीत आहे. देशातील ७७० शहरातील २७००० किराणा दुकाने फ्लिपकार्ट नेटवर्कने जोडली गेली आहेत. कंपनीने नुकतीच याची घोषणा केली असून हे पाउल टाकण्यामागे १६ कोटी ग्राहकांच्या ई कॉमर्स विषयीचा अनुभव अधिक चांगला बनविणे हा उद्देश असल्याचे म्हटले आहे.

कंपनी भारतातील मोठ्या शहरांबरोबर छोटी शहरे आणि निमशहरी भागात त्याच्या व्यवसायाचा विस्तार करत असून नवीन क्षेत्रात पोहोचणे हाही त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर देशातील दुकानदारांना याचा फायदा मिळणार आहे. आगामी सणउत्सव आणि बिग बिलियन डेज मध्ये यामुळे देशातील कोट्यावधी ग्राहकांपर्यंत कंपनी पोहोचू शकणार आहे. कंपनीचे डिलीव्हरी नेटवर्क अगोदरपासून मजबूत आहेच. देशाच्या सर्व पिनकोडवर दररोज किमान १० लाख पार्सल डीलीव्हर केली जात आहेत.

किराणा दुकानांशी नेटवर्क जोडण्याची सुरवात सहा महिन्यापूर्वीच केली गेली असल्याचे कंपनी अधिकारी म्हणाले.