जरपाल क्वीन – पाकवरील भारताच्या विजयाची देखणी निशाणी


वॉर ट्रॉफी जरपाल क्वीन याविषयी तुम्ही काही ऐकले आहे काय? नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.१९७१ च्या भारत पाक युद्धात भारताने पाकिस्तानला खडे चारले आणि जरपाल क्वीन ही अमेरिकेत उत्पादित झालेली पण पाकच्या जरपाल नावावरून नाव पडलेली जीप विजय ट्रॉफी म्हणून भारतात आणली गेली आणि आज ४८ वर्षानंतरही त्याच तोऱ्यात वॉर ट्रॉफी म्हणून जपली जात आहे.

इतक्या वर्षानंतरसुद्धा ही जीप अत्यंत उत्तम परिस्थितीत आहे आणि तिची खास देखभाल केली जाते. लेहच्या ३ ग्रेनेडीअर रेजिमेंट शिबिरात ही जीप आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. रॉयल्टीचे प्रतिक असलेल्या या जीपवर उर्दू भाषेत काही अक्षरे लिहिली गेली आहेत. या जीपकडे भारताची बहुमोल संपत्ती म्हणून पहिले जाते.

या जीपवर काही वर्षांपूर्वीपर्यंत रीकॉय गन बसविलेली होती. १९८२ मध्ये ही जीप ३ ग्रेनेडिअर रेजिमेंट मध्ये सामील केली गेली असे सेना मेडल विजेते कर्नल (निवृत्त) जे. एस. ढिल्लो यांनी सांगितले. ते म्हणाले जेथे जेथे ही रेजिमेंट जाते, तेथे जरपाल क्वीन नेली जाते.

Leave a Comment