कोणी रेखली ही विशाल रहस्यमयी चित्रे?


प्राचीन काळापासून माणूस चित्रे रेखतो आहे. अति प्राचीन काळी गुहा, जमिनीवर अश्या कलाकृती रेखल्या जात त्या आजही पाहता येतात. माणसाने चित्रे रेखाटण्याबरोबर मूर्तीही घडविल्या. आज जगभरातील बहुतेक सर्व देशात अशी चित्रे. मूर्ती आढळतात आणि त्यांचे सौंदर्य, आकर्षकपणा पाहणाऱ्याला थक्क करतो. विशेष कोणतीही साधने नसताना माणसाने या कलाकृती कश्या बनविल्या असतील याचे नवल वाटत राहते. पण पेरू देशाच्या दक्षिण भागातील नाझाका वाळवंटात दिसणाऱ्या कलाकृती अजब म्हणाव्या अश्या आहेत आणि त्या नाझका लाईन्स या नावाने प्रसिद्ध आहेत.

या वाळवंटात अतिविशाल अश्या अनेक आकृती दिसतात आणि त्या हेलिकॉप्टर मधून सहज पाहता येतात. ५०० चौरस किलोमीटर परिसरात दिसणाऱ्या या आकृती माणसाने बनविलेल्या असणे केवळ अशक्य आहे. या आकृती कुणी आणि कधी बनविल्या याचे रहस्य कायम आहे. काही जणांच्या मते या परग्रहवासीयांनी बनविल्या असाव्यात. यात माणसाचे, झाडे, जनावरे याच्या अतिविशाल आकृती आहेत. येथे काही अगदी सरळसोट रेघाही दिसतात.

Leave a Comment