कानात हँडफ्री डिव्हाईस लावून ड्रायविंग केल्यास ५००० रु.दंड


मोटार वाहन कायद्यातील नवीन सुधारणा सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय बनल्या आहेत. त्यात वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास पूर्वीपासूनच १००० रुपये दंडाची तरतूद आहे पण या नियमाची अंमलबजावणी फारश्या कठोरपणे होताना दिसलेली नाही. आता मात्र या नियमाचे पालन कठोरपणे केले जाणार असून वाहन चालविताना केवळ मोबाईलवर बोलणेच नव्हे तर हँडफ्री डिव्हाईस कानात घालणे, वायरलेस डिव्हाइस किंवा स्पीकरफोनवर बोलणाऱ्यांचा खिसा थेट ५ हजार रुपयांनी हलका केला जाणार आहे.

बस, ट्रक सारखी मोठी वाहने चालविणारे चालक अथवा कारचालक या डिव्हाइसच्या मदतीने मोबाईल वर बोलत असतील तर रस्त्यातील सीसीटीव्ही कॅमेरे या चालकांचा हा गुन्हा नोंदविण्यास फारसे उपयोगी पडत नाहीत. बाईक किंवा स्कुटरचालक गर्दीचा फायदा घेऊन मोबाईलवर बोलत असले तरी पोलिसांना सहज चुकवू शकतात. शिवाय आजकाल बाजारात वायरलेस हँडफ्री, ब्ल्यूटूथ सारखी डिव्हायसेस सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे ही उपकरणे वापरून ड्रायव्हिंग करणे आणखी सोपे झाले आहे.

मात्र मोटार वाहन कायद्यातील नवीन नियमानुसार आता पोलीस या बाबत अधिक सक्त राहणार आहेत आणि नियम मोडणाऱ्याला दंड ठोठावणार आहेत. मोबाईलवर बोलत असताना यापैकी कोणतेही उपकरण वापरले तर वाहन चालकाचे लक्ष विचलित होतेच आणि त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते असे कारण त्यामागे दिले गेले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment