चलानची रक्कम न भरल्यास पडणार महागात

1 सप्टेंबरपासून वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यावर दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. अनेकजण चलान कापले गेले असले तरी देखील दंडाची रक्कम भरणे टाळतात. मात्र आता जर एखादी व्यक्ती दंडाची रक्कम भरत नसेल तर ती रक्कम विम्याच्या प्रिमियममध्ये समाविष्ट केली जाणार आहे. जेणेकरून, पुढील वेळी विम्याचा प्रमियम भरताना ही रक्कम वसूल केली जाईल.

यामुळे पोलिसांना दंडाची रक्कम वसूल करण्यास सोपे जाणार आहे. भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने या योजनेवर काम करण्यास सुरूवात केली आहे. सध्या ही योजना दिल्लीमध्ये लागू करण्यात येणार आहे.

नवीन ट्रॅफिक नियम लागू झाल्यानंतर लोकांना ई-चलान पाठवले जात आहे. जर विम्याचा हा प्रयोग यशस्वी झाला तर संपुर्ण देशात याची अंमलबजावणी केली जाईल.

यासाठी 9 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्यामध्ये ट्रॅफिक पोलिस, विमा प्राधिकरण, इंश्योरेंस इंफोर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया आणि प्रमुख विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. ही समिती आठ आठवड्यात आपला रिपोर्ट सादर करेल.

चलानची रक्कम वाढल्यापासून दिल्लीमध्ये मागील सहा दिवसाता चलानजवळपास 80 टक्के कमी झाले आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, दंडाची रक्कम वाढल्याने लोकांच्या मनात भिती आहे. यामुळे लोक ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघन करत नाहीत.

Leave a Comment