चलानपासून वाचण्यासाठी या व्यक्तीने शोधली हटके पध्दत

नवीन ट्रॅफिक नियम सुरू झाल्यापासून देशभरात चलानबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. काही लोक या नियमाला विरोध करत आहेत. तर काही जण हे नियम योग्य असल्याचे म्हणत आहेत. याच पार्श्वभूमीवर गुजरातच्या एका व्यक्तीने चलानपासून वाचण्यासाठी एक हटके पध्दत शोधून काढली आहे.

वडोदराच्या राम शाहने चलानपासून वाचण्यासाठी जबरदस्त आयडिया शोधली आहे. या आयडियामुळे ट्रॅफिक पोलिस देखील खुश झाले आहेत.

दुचाकी चालवणाऱ्या राम शाहने आपल्या हेल्मेटवरच गाडीची आरसी, विम्याची स्लिप, ड्रायव्हिंग लायसेंस सारखे महत्त्वाचे कागद चिटकवले आहेत.

राम शाहला पकडल्यावर सर्व काही हेल्मेटवरच दिसून येते व यामुळे पोलिस देखील खुश होतात. राम शाह म्हणाले की, यामुळे मला देखील त्रास होत नाही व दंड भरण्यापासून देखील वाचतो.

 

Leave a Comment