चांद्रयान 2 – अजुनही आशा कायम, विक्रम लँडर व्यवस्थित

चंद्रावर लँडिंग करण्याच्या अवघ्या काही सेंकदाआधी विक्रम लँडरचा पृथ्वीवरील केंद्राशी त्याचा संपर्क तुटला. मात्र ऑर्बिटरने पाठवलेल्या फोटोमुळे विक्रम लँडर व्यवस्थित असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग केले असले तरी देखील विक्रम लँडरचे काहीही नुकसान झालेले नाही. इस्रोनुसार, ऑर्बिटरने पाठवलेल्या फोटोमध्ये लँडरचा एकच संपुर्ण भाग दिसत आहे. इस्रोची टीम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.

इस्रोच्या वैज्ञानिकांनुसार, विक्रम लँडर एका बाजूला झुकलेला दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा संपर्क होण्यासाठी लँडरचा एंटीना हा ऑर्बिटर अथवा ग्राउंड स्टेशनच्या दिशेने असायला हवा. जर विक्रम लँडरशी संपर्क झाला तर लँडर स्वतः स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. यासाठी इस्रोची टीम सतत काम करत आहे.

विक्रममध्ये ऑबोर्ड कॉम्प्युटर सिस्टम आहे. ज्यामुळे कंमाड मिळाल्यावर लँडर थस्टर्सद्वारे पुन्हा उभा राहू शकतो. लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर पडल्याने त्याचा एंटीना दबला गेला आहे. त्यामुळे इस्रोच्या टीमला संपर्क साधण्यास अडथळे निर्माण होत आहेत. जर विक्रम लँडरशी संपर्क साधण्यास यश आले तर भारत नक्कीच एक आगळावेगळा इतिहास लिहू शकतो.

याचबरोबर इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी ही मोहिम 95 टक्के यशस्वी झाल्याचे म्हटले होते. याचबरोबर पुढील 14 दिवस लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment