हेल्मेट-युटर्न-मोबाईल आणि हॉर्न – 5 दिवसात 72 लाखांचे चलान

मोटार वाहन कायदा 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात आलेला आहे. यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम देखील कितीतरी पटीने वाढली आहे. दिल्ली, मुंबई, गुरूग्राम अथवा बंगळुरू असो, सर्वच ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पोलिस मोठ्या प्रमाणात दंड वसूल करत आहे. याच पार्श्वभुमीवर बंगळुरू ट्रॅफिक पोलिसांकडून एक नवीन डाटासमोर आला आहे. यानुसार बंगळुरूमध्ये मागील 5 दिवसात तब्बल 72,49,900 रूपयांचे चलान कापले आहे.

बंगळुरू पोलिसांनी जारी केलेल्या 4 ते 9 सप्टेंबरपर्यंतच्या डाटानुसार, चलान कापल्यावर तब्बल 72 लाख रूपये वसूल करण्यात आले आहेत. यामध्ये पोलिसांकडून सर्वाधिक प्रमाणात हेल्मेट परिधान न केल्याने दंड वसूल करण्यात आला आहे.

याचबरोबर चुकीच्या पध्दतीने युटर्न, वेगाने गाडी चालवणे, नो एंट्रीमध्ये घुसणे, मोबाइल फोनचा वापर यासारखे 6813 प्रकरण समोर आली आहेत.

1 सप्टेंबरपासून दंडाच्या रक्कमेत वाढ केल्यापासून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात चलान कापल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी 23 हजार तर काही ठिकाणी 59 हजार रूपयांचे चलान कापल्याचे देखील समोर आले आहे.

Leave a Comment