अफगाणिस्तानचा शानदार विजय, 140 वर्षात अशी कामगिरी करणारा दुसराच संघ

बांग्लादेशमधील चटगाव येथे खेळल्या गेलेल्या एकमात्र कसोटी सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने बांग्लादेशचा 224 धावांनी पराभव केला. याचबरोबर कसोटी सामन्यात आपला दुसरा विजय देखील नोंदवला. बांग्लादेशचा संघ अफगाणिस्तानच्या 398 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या दिवशी 173 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

या विजयासह कमी कालावधीत कसोटीत दुसरा विजय मिळवणारा ऑस्ट्रेलियानंतर  अफगाणिस्तान एकमेव संघ आहे. ऑस्ट्रेलियाने 1877 ते 1879 मध्ये पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळवला होता. त्यानंतर आता अफगाणिस्तानने 2018 ते 2019 दरम्यान तीन कसोटी सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळवत विक्रम केला आहे.

140 वर्षानंतर अशी कामगिरी करणारा अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियानंतर दुसराच संघ आहे.

अफगाणिस्तानने पहिल्या डावात 342 धावा केल्या होत्या. त्यानंतर कर्णधार राशिद खानच्या 5 विकेट्सच्या जोरावर अफगाणिस्तानने बांग्लादेशला 205 धावांवर रोखत 137 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात अफगाणिस्तानच्या संघाने 260 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात 398 धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघाला 205 धावाच करता आल्या व बांग्लादेशने 224 धावांनी आपला दुसरा कसोटी विजय मिळवला.

या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने 11 विकेट्स आणि शानदार अर्धशतकीय खेळी केली.

Leave a Comment