प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांचे निधन

ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे वयाच्या 95 व्या वर्षी आज सकाळी निधन झाले. त्यांच्या दिल्लीतील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अनेक दिवसांपासुन आजारी होती. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना श्रध्दांजली दिली. जेठमलानी यांचा एक मुलगा महेश जेठमलानी हा देखील प्रसिध्द वकील आहे. तर त्यांची एक मुलगी अमेरिकेमध्ये राहते.

महेश यांनी सांगितले की, काही दिवसांनीच 14 सप्टेंबरला राम जेठमलानी यांचा 96 वा जन्मदिवस होता. तसेच त्यांच्या वडिलांचा अंत्यसंस्कार लोधी रोड येथे करण्यात येणार आहे.

जेठमलानी यांचा जन्म सिंध प्रांतातील सिखारपूर येथे 14 सप्टेंबर 1923 ला झाला होता. 1959 मध्ये नानावटी विरूध्द महाराष्ट्र सरकार ही केस लढल्याने पहिल्यांदा त्यांचे नाव चर्चेत आले होते. याचबरोबर त्यांनी राजीव गांधी यांच्या हत्या करणाऱ्यांची देखील केल लढली होती.

2010 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या बार अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. याचबरोबर त्यांनी सहाव्या व सातव्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर मुंबईमधून निवडणूक जिंकली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते कायदामंत्री आणि शहरी विकास मंत्री देखील होते. याचबरोबर 2004 मध्ये त्यांनी लखनऊमधून अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरोधातच निवडणूक लढवली होती.

 

Leave a Comment