धोनीला योग्य वागणूक दिली पाहिजे – कुंबळे

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला वहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखालीच अनेकदा चेन्नई सुपर किंग्सने विजेतेपदावर नाव कोरले. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये धोनी भारतीय संघात नक्कीच असेल यात तर काही शंका नाहीच. मात्र धोनीच्या निवृत्तीबद्दल देखील अनेकदा चर्चा होत असते. आता भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी देखील धोनीच्या निवृत्तीविषयी भाष्य केले आहे.

अनिल कुंबळे म्हणाले की, जेव्हा कधी धोनी निवृत्तीचा निर्णय घेईल, त्यावेळी त्याला सन्मानाने निवृत्ती मिळायला हवी. संघासाठी निवड समितीने त्याच्याशी बसून चर्चा करायला हवी.

पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपला समोर ठेऊन कोणती टीम निवडावी याकडे निवड समितीने लक्ष्य द्यावे, असेही कुंबळे म्हणाले.

कुंबळे म्हणाले की, एकदिवसीय वर्ल्ड कप दरम्यान आपण चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीमध्ये सातत्याने बदल करत आलो. हीच गोष्ट टी-20 वर्ल्ड कपमध्ये होऊ नये. योग्य संघ सातत्याने खेळणे गरजेचे आहे.

तसेच, सध्या धोनीने क्रिकेटपासून काही काळासाठी विश्रांती घेतली असून, दक्षिण अफ्रिकेविरूध्द होणाऱ्या मालिकेत देखील तो खेळणार नाही.

 

Leave a Comment