यासाठी गुगल आणि फेसबुकचे कर्मचारी जात आहेत कॉमेडी क्लासला

अमेरिकेच्या शिकागोमधील सेंकड सिटी कॉमेडी क्लब मागील 60 वर्षांपासून सर्वोत्तम कॉमेडीसाठी ओळखला जातो.  जोआन रिवर्स, जॉन कँडी आणि बिल मुरे सारखे दिग्गज या ठिकाणी येऊन गेले आहेत. मात्र मागील काही काळापासून हा क्लब मोठमोठ्या मॅनेजर्संना ट्रेनिंग देण्यासाठी चर्चेत आहे.

ट्विटर, गूगल, फेसबुक, नाइकी, निसान, मॅकडोनल्ड्स सारख्या मोठमोठ्या कंपन्यातील मॅनेजर्स, इंजिनिअर्स आणि एक्झिटिव्ह येथे कॉमेडीची ट्रेनिंग घेण्यासाठी पाठवले जात आहेत. सेंकड सिटी कॉमेडी क्लबचे प्रमुख केली लेनॉर्ड सांगतात की, ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जेणेकरून, कॉर्पोरेट कर्मचारी क्लाइंटबरोबर चांगल्याप्रकारे व्यवहार करू शकतील व त्यांच्यातील सॉफ्ट स्किल वाढेल.

याचबरोबर कर्मचाऱ्यांनी रोजची नोकरी आनंदात करावी यासाठी देखील हे केले जात आहे. कंपनी आपल्या घमंडी कर्मचाऱ्यांना चांगले बनवण्यासाठी कॉमेडी क्लासला पाठवत आहे. यामुळे सेंकड सिटी क्लबच्या कमाईत झपाट्याने वाढ झाली आहे.

क्लबने सांगितले की, त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 5 करोड डॉलर आहे. यातील एक तृतीयांश हिस्सा हा कॉमेडी क्लासेसचा आहे. क्लबने 2002 मध्ये कॉमेडी वर्कशॉप्सची सुरूवात केली होती. त्यांनी आतापर्यंत 700 क्लाइंट्सबरोबर काम केले आहे. क्लबने यासाठी शिकागो, टोरंटो, लॉस एंजिल्स या ठिकाणी देखील सेंटर सुरू केले आहेत.

इंप्रूव असायलम देखील सेंकड सिटी कॉमेडी क्लब सारखाच आहे. त्यांचे बोस्टन आणि न्युयॉर्कमध्ये कॉमेडी थेअटर्स आहेत. या ग्रुपने गूगल, पीडब्ल्यूसी, हार्वर्ड, मॅसाच्युसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी इत्यादींना ट्रेनिंग दिली आहे.

Leave a Comment