तुम्ही पाहिला आहे का जगातील सर्वात छोटा घोडा ?

घोडे तर तुम्ही अनेकदा पाहिले असतील. मात्र जगातील सर्वात छोटा घोडा पाहिला आहे का ? जगातील सर्वात छोट्या घोड्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. बॉम्बेल नावाचा हा घोडा पॉलंडमधील आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार या घोड्याची उंची केवळ 56.7 सेमी (1 फूट 10 इंच) आहे. हा घोडा एवढा प्रसिध्द आहे की, लोक त्याला पाहण्यासाठी गर्दी करतात.

पोलंडमधील कासकाडा येथील फार्ममध्ये तो एका दुसऱ्या मोठ्या घोड्याबरोबर राहतो.

या घोड्याचे मालक पॅट्रीक आणि केटरजाइना यांनी 2014 मध्ये त्याला सर्वात प्रथम पाहिले होते. त्यावेळी हा छोटा घोडा केवळ दोन महिन्यांचा होता. पहिल्यांदा त्यांना वाटले की, त्याला काहीतरी झाले आहे, मात्र नंतर समजले की, त्याची वाढच होत नाही. त्यानंतर त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद करण्याचा विचार केला.

त्याच्या मालकांनी सांगितले की, घोडा छोटा असला तरी त्याचे मन खूप मोठे आहे. दर आठवड्याला तो हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथील आजारी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणतो.

सोशल मीडियावर बॉम्बेलचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. युजर्स देखील या मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत.

 

Leave a Comment