जाणून घ्या चांद्रयान 2 च्या शास्रज्ञांच्या टीमबद्दल

भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेला अखेरच्या क्षणी अडथळा आला होता. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याआधी विक्रम लँडरचा संपर्क २.१ कि.मी.वर तुटला. मात्र असे असले तरीह देखील अनेक अर्थाने चांद्रयान 2 ही भारतासाठी यशस्वी मोहिम ठरली. या संपुर्ण मिशनचा खर्च हा 978 करोड रूपये होता. इतर मिशनच्या तुलनेत या मिशनसाठी अगदी कमी खर्च आला. आणखी एक खास गोष्ट म्हणजे या मिशनसाठी काम करणाऱ्या 16,500 लोकांनी पैकी 30 टक्के कर्मचारी या महिला आहेत. या मिशनचे नेतृत्व करणाऱ्यांविषयी जाणून घेऊया.

प्रोजेक्ट डारेक्टर – एम. वनिता

या मिशनसाठी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून नेमणूक होण्याआधी त्या डाटा स्पेशलिस्ट म्हणून यु.आर. राव सेटेलाइट सेंटर येथे कार्यरत होत्या. 20 वर्षांचा दिर्घ अनुभव असणाऱ्या वनिता या कार्टोसॅट – 1, ओशनसॅट – 2 या मिशनच्या टीमच्या देखील त्या सदस्या होत्या. 2006 मध्ये त्यांना अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाकडून बेस्ट वुमन सायंटिस्टचं पारितोषिक मिळालेले आहे.

मिशन डायरेक्टर – रितू करिधल (रॉकेट वुमन ऑफ इंडिया)

रितू करिधल या 2013 सालच्या ‘मार्स ऑर्बिटर मिशन’च्या डेप्युटी डायरेक्टरही होत्या. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स येथून त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते रितू करिधल यांना 2007 साली त्यांना इस्रोचा ‘यंग सायंटिस्ट’ पुरस्कारही मिळालेला आहे.

इस्रोचे चेअरमन – ‘रॉकेट मॅन’ के. सिवन

रॉकेट मॅन म्हणून ओळखले जाणारे के. सिवन यांना 2011 साली ‘डॉ. बिरेन रॉय स्पेस सायन्स आणि डिजाईन अॅवार्ड’ मिळालेला आहे. सिवन यांच्या सायक्रोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि रीयूजेबल लाँच व्हेइकल प्रोग्राम्समध्ये योगदान दिले आहे. या कारणास्तव त्यांना इस्रोचे ‘रॉकेट मॅन’ देखील म्हटले जाते.

यु.आर राव सेटेलाइट सेंटर बंगळुरूचे डारेक्टर – एम. अण्णादुराई

एम. अण्णादुराई हे चांद्रयान – 1 मोहिमेचे मिशन डायरेक्टर होते. तसेच ते चांद्रयान 2 चे सर्वात पहिले प्रोजेक्ट डायरेक्टर देखील होते. त्यांच्यानंतर एम. वनिता यांनी चांद्रयान 2 मिशनच्या प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून पदभार स्विकारला.

याचबरोबर या मिशनमध्ये डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर सी. कुमार आणि अमिताभ सिंह, मॅकेनिकल इंजिनिअर डॉ. एस. सोमनाथ, डॉ. वी. नारायण, जे. जयप्रकाश आणि व्हेकिल डायरेक्टर रघुनाथा पिल्लाई यांचा देखील मोठा वाटा होता.

Leave a Comment