अ‍ॅमेझॉनला आगीपासून वाचवण्यासाठी 7 देशांच्या नेत्यांची झोपडीत बैठक

अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला आगीपासून वाचवण्यासाठी कोलंबियाच्या लेटिसिआ जंगलाच्या मध्यभागी असलेल्या झोपडीत सात देशांचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती नेते उपस्थित होते. या शिखर परिषदेदरम्यान 7 देशांनी जंगल संरक्षण करारावर सह्या केल्या. याचबरोबर जंगल संरक्षणासाठी डिजास्टर रिस्पॉन्स नेटवर्क बनवण्यासाठी देखील सर्व देशांमध्ये सहमती झाली.

यादरम्यान अ‍ॅमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्या समुदायांची भूमिका वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली. कोलंबियाचे राष्ट्रपती इवान ड्युक यांनी सांगितले की, या सर्व घटनांवर राष्ट्रपती कार्यालयातून लक्ष्य ठेवण्यात येईल.

या शिखर परिषदेमध्ये बोलिवियाचे राष्ट्रपती इवो मोर्लेस, कोलंबियाचे राष्ट्रपती इवान ड्युक, मंत्री रिकार्डो लेजानोस इक्वाडोरचे लेनिन मोरेनो, सुरीनामचे उपराष्ट्रपती मायकल एडिन, ब्राजीलचे परराष्ट्रमंत्री अर्नेस्टो राउजो आणि गुयानाचे मंत्री रेफल टॉर्टमेन हे उपस्थित होते.  तसेच, काही दिवसांपुर्वीच सर्जरी झाल्याने ब्राजीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो उपस्थित राहू शकले नाही. अ‍ॅमेझॉनच्या जंगलात आग लागल्यानंतर सर्वात जास्त टीका त्यांच्यावरच झाली होती.

ब्राझीलच्या अ‍ॅमेझॉन जंगलात मागील 2 महिन्यांपासून आग लागली आहे. केवळ ऑगस्ट महिन्यातच 66 हजार आगीच्या घटना घडल्या आहेत. 2018 च्या तुलनेत यावर्षी आगीच्या घटनेत 85 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

Leave a Comment