ट्रेनमधील या पदार्थांची जागा घेणार पोहे, उत्तप्पा आणि ब्रेड वडे

वंदे भारत ट्रेनमध्ये पुढील आठवड्यापासून प्रवाशांना कॉन्टीनेंटल जेवणाऐवजी देशी जेवण देण्यात येणार आहे. आयआरसीटीसी प्रवाशांच्या सुचनांनंतर आता रेल्वेत पोहे, ब्रेड वडे, चटणी या गोष्टी देखील देणार आहे. तसेच, दिल्ली ते वैष्णो देवीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये नॉन व्हेज जेवण मिळणार नाही.

दिल्ली ते वाराणसी या दरम्यान चालणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये फाइव स्टार हॉटेलमधून जेवण दिले जाते. याचमुळे राजधानी एक्सप्रेसच्या तुलनेत यातील जेवण 150 रूपयांनी महाग आहे. हे रेल्वे फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.

या गोष्टी बदलल्या –

  • याआधी देण्यात येणाऱ्या वस्तू – ब्रुसकेटा, क्रोइसंत, डोनट, मफिन, वेजीटेबल क्वीचे, चॉकलेट बार, कुकीज
  • आता मिळणार – कटलेट, पोहे, उत्तप्पा, मेंदूवडा, ब्रेड वडे, आमलेट, कोकोनट चटणी

आयआरसीटीसीचे मेन्यू  –

  • कॉम्बो 1 – व्हेज कटलेट, पोहे, दही, ब्राउन ब्रेड, बटर, सॉस, ज्यूस
  • कॉम्बो 2 – उत्तप्पा, वेमीचिली, कोकोनट चटणी, दही, ब्राउन ब्रेड, बटर, सॉस, ज्यूस
  • कॉम्बो 3 – मेंदुवडा, सुजी उपमा, चटणी, दही, ब्राउन ब्रेड, बटर, सॉस, ज्यूस
  • कॉम्बो 4 – मसाला ऑमलेट, कटलेट, तळलेली भाजी, दही, ब्राउन ब्रेड, बटर, सॉस, ज्यूस

 

Leave a Comment