49 वर्ष जुन्या फुटबॉल स्टेडियममध्ये लावण्यात आली 300 झाडे

ऑस्ट्रियाच्या 49 वर्ष जुन्या वर्दरसी स्टेडियममध्ये पर्यावरणासाठी एक हटके आणि जागृकता पसरवणारे पाऊल उचलण्यात आले आहे. 1960 मध्ये या मैदानावर फुटबॉल सामने होत आहेत. मात्र आता येथे सामने होणार नाहीत. मैदानाच्या मध्यभागी आता जवळपास 300 झाडं लावण्यात आली आहेत. आता या स्टेडियममध्ये लोक सामने नाही तर झाडांचे प्रदर्शन बघायला येतात. झाडे बघण्यासाठी तिकीट ठेवण्यात आले आहे. जेणेकरून येथे येणाऱ्या लोकांना झाडांचे महत्त्व समजू शकेल.

रविवारपासून येथील प्रदर्शन सुरू करण्यात आले आहे. एकावेळी तब्बल 30 हजार लोक या स्टेडियममध्ये येऊ शकतात. येथे लावण्यात आलेल्या झाडांमुळे दरवर्षी 35380 किलोग्राम ऑक्सीजन देखील मिळेल.

1970 मध्ये मॅक्स पीटनरने एक पेसिंल स्केच बनवले होते. याच स्केचचा संदेश लक्षात घेत वर्दरसी स्टेडिअममध्ये झाडांचे प्रदर्शन भरवण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजर क्लॉस यांनी काम केले.

Leave a Comment