गिअरवाली बाईक चप्पल आणि सँडल घालून भरावा लागणार दंड


मुंबई : सध्या देशभरात नवीन वाहतुक नियमांची आणि त्यामुळे भराव्या लागणाऱ्या दंडाचीच चर्चा सुरु आहे. पण आता त्यात कमी म्हणून की काय आता चप्पल आणि सँडल घालून जर बाईक चालवली तरीही दंड भरावा लागणार आहे.

तुम्ही जर बाईक चालवताना चप्पल आणि सँडलचा वापर केला, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. चप्पल आणि सँडल घालून बाईक चालवणे हे वाहतुक नियमांच्या विरोधात आहे. हा खूप जुना नियम असून सक्तीने लागू करण्यात येत नव्हता. पण आता जर चप्पल किंवा सँडल घालून बाईक चालवली तर दंड भरावा लागणार. तुम्ही गिअर असलेली बाईक चप्पल आणि सँडल घालून चालवली तरच तुमच्यावर कारवाई होऊ शकते, असे वाहतुक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हा नियम पूर्वीपासून आहे. पण आता हा नियमही वाहतुक नियम कठोर केल्याने सक्तीने लागू करण्यात येत असल्यामुळे गिअर बाईक चालवताना चप्पल किंवा सँडल घालणे प्रत्येकासाठी धोकादायक ठरु शकते. दरम्यान, नव्या वाहतुक नियमावरुन विरोधकांकडून विरोध होत आहे. माझ्या गरीब भाऊ-बहिणींनो सतर्क राहा. गावचा शेतकरी, कामगार, गरीब विद्यार्थी आता चप्पल घालून बाईक चालवू शकत नाही. मोदी-योगींच्या राज्यात सूट-बूट घालून बाईक चालवावी लागेल. नाहीतर जोगी बाबा यांची पोलीस हजारो रुपयांचा दंड आकारु शकते, असे ट्विट समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आयपी सिंह यांनी केले आहे.

Leave a Comment