या वस्तुच्या एका ग्रॅमची किंमत 394 लाख कोटी रुपये


या जगात अशा अनेक महागड्या गोष्टी आहेत, ज्या घेण्याच्या आपण केवळ कल्पनाच करु शकतो. विशेष ठिकाणी या वस्तू वापरल्या जातात. ग्रॅममध्ये या वस्तूंची किंमत लाख ते कोटी रुपयांच्या घरात आहे. त्याच वस्तुंची माहिती आम्ही आज तुम्हाला करुन देणार आहोत.

अँटिमॅटर हे सर्वात जगात महागडे आहे. अंतराळात जाणाऱ्या उपग्रहांच्या, विमानांच्या इंधनासारखा याचा वापर केला जाऊ शकतो. 393.75 लाख कोटी रुपये याच्या एका ग्रॅमची किंमत आहे.

त्यानंतर दुसरी महागडी वस्तू आहे कॅलिफोर्नियम. 170.91 कोटी रुपये एवढी याच्या एक ग्रॅमची किंमत आहे. न्यूक्लिअर रिअॅक्टरमध्ये या वस्तूंचा वापर केला जातो.

महागडे असे हिऱ्याचे दागिणे ओळखले जातात. पण हिऱ्याचे दागिणे जगातील सर्वात महाग वस्तूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. 37.81 लाख रुपये एवढी याच्या एका ग्रॅमची किंमत आहे.

ट्रिटियम यात चौथ्या क्रमांकावर आहे. महागडी घड्याळे, औषधे, रेडिओ थेरपी यामध्ये याचा वापर केला जातो. 18.6 लाख एवढी याच्या एका ग्रॅमची किंमत आहे.

टॅफिट स्टोन जगातील सर्वात महागड्या वस्तू्ंमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. रत्न म्हणून वापर केल्या जाणाऱ्या स्टोनच्या एका ग्रॅमची किंमत 12.6 लाख रुपये आहे.

Leave a Comment