चांद्रयान 2 विक्रम लाँडरचा संपर्क तुटल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो – इंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशन) अनेक वैज्ञानिकांसह इस्रो प्रमुख डॉ. के. सिवन भावूक झाले. स्वतःला सांभाळत शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच रडू लागले. त्यांना निराश पाहून पंतप्रधानांनी त्यांना मिठी मारली. आज आम्ही आपणास त्यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी सांगत आहोत, त्या गोष्टी वाचून तुम्हाला देखील इस्रोच्या प्रमुखांचा अभिमान वाटेल.
इस्रो प्रमुखांचे पूर्ण नाव डॉ कैलाशवादिवू सिवन असे आहे. त्यांचा जन्म 1 एप्रिल 1957 साली तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील सारक्कलविलाई गावात एका शेतकर्याच्या घरी झाला. सिवन यांनी तामिळ माध्यमातून सरकारी शाळेत शिक्षण घेतले आहे. त्यांनी नागरकोइलच्या एसटी हिंदू महाविद्यालयातून पदवी संपादन केली. सिवन पदवीधर होणारे त्याच्या कुटुंबातील पहिले सदस्य आहेत. त्यांचे भाऊ व बहिणी गरिबीमुळे उच्च शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत.
पण सिवन यांचा प्रवास येथेच थांबला नाही. 1980 मध्ये त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) कडून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (आयआयएससी) कडून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर 2006 मध्ये त्यांनी आयआयटी बॉम्बेकडून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पीएचडी प्राप्त केली.
2018 मध्ये सिवन यांची इस्त्रोचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले. यापूर्वी ए.ए. एस. किरण कुमार इस्रो प्रमुख होते. सिवन यांच्या म्हणण्यानुसार, ते कॉलेजमध्ये असतानाच शेतात वडिलांना मदत करायचे. याच कारणास्तव, पदवीनंतरचे प्रवेश जवळच्या महाविद्यालयात झाला. पण जेव्हा त्यांना बीएससीमध्ये गणित विषयात 100% गुण मिळाले तेव्हा त्यांनी अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देण्याचे ठरवले.
सिवन यांच्या म्हणण्यानुसार, लहानपणी त्यांच्याकडे कपडे घालण्यासाठी शूज आणि चप्पलही नव्हत्या. ते बर्याचदा अनवाणीच राहिले. कॉलेजपर्यंत धोती घालायचे. एमआयटीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी प्रथम पँट घेतली होता. ते कधीही शिकवणी किंवा कोचिंग क्लासमध्ये गेले नाही.
सिवन हे 1982 साली इस्रोमध्ये दाखल झाले. येथे त्यांनी जवळजवळ प्रत्येक रॉकेट प्रोग्राममध्ये काम केले. इस्रो प्रमुख बनण्यापूर्वी ते रॉकेट निर्माता विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी) चे संचालक देखील होते.
सिवन यांच्या सायक्रोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि रीयूजेबल लाँच व्हेइकल प्रोग्राम्समध्ये योगदान दिले आहे. या कारणास्तव त्यांना इस्रोचे ‘रॉकेट मॅन’ देखील म्हटले जाते.
15 फेब्रुवारी 2017 रोजी, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित केले. सिवन यांनी या मोहिमेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच इस्रोचा हा जागतिक विक्रम आहे.
त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत
1999 – श्री हरि ओम आश्रम प्रेरणा डॉ. विक्रम साराभाई संशोधन पुरस्कार
2007 – इस्रो मेरिट पुरस्कार
2014 – सत्यभामा विद्यापीठ, चेन्नईमधून डॉ ऑफ सायन्स पदवी
रॉकेट तज्ज्ञ सिवन यांना आपल्या मोकळ्या काळात तामिळ शास्त्रीय गाणी ऐकणे आणि बागकाम करणे आवडते. 1969 साली आलेला राजेश खन्ना यांचा आराधना हा त्यांचा आवडता चित्रपट आहे.