गुगलमुळे प्रियंकाच्या नावात गफलत


ग्लोबल स्टार म्हणून बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही ओळखली जाते. तिचे जगभरात लाखो करोडो चाहते असल्यामुळेच प्रियंकाचे नाव इंटरनेटवरही सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या नावांमध्ये अग्रस्थानी असते. पण सध्या तिच्या नावामध्ये गुगलचा गोंधळ झालेला दिसत आहे. कारण, प्रियंकाच्या नावासमोर गुगलमध्ये चोप्रा किंवा जोनास नाही तर ‘सिंह’ हे आडनाव पाहायला मिळत आहे.

प्रियंकाच्या विकीपिडिया बॉक्समध्येदेखील प्रियंकाच्या नावासमोर ‘सिंह’ हे आडनाव दिसते. मात्र, त्यावर क्लिक केल्यानंतर प्रियंका चोप्रा असेच दिसत असल्यामुळे हा नेमका गोंधळ काय आहे, याचा शोध लागला नाही. काहींनी तर प्रियंकाच्या आगामी चित्रपटांचे तर हे कनेक्शन नाही ना, असा अंदाज व्यक्त केला आहे. प्रियंकाची यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Leave a Comment