फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीकडून नरेश गोयल यांची चौकशी


मुंबई – जेट एअरवेज कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विदेशी चलन हस्तांतरण (फेमा) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी केली. ईडीच्या अधिकाऱ्याने त्या प्रकरणाबाबत चौकशी करण्यात आल्याचे सांगितले. ई़डीने गेल्यावर्षी नरेश गोयल यांचे कार्यालय व निवासस्थानी झडती घेतल्यानंतर प्रथमच ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. फेमा कायद्यांतगर्त गोयल यांनी मांडलेली बाजू नोंदविण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

ऑगस्टमध्ये ईडीकडून गोयल यांचे मुंबईमधील निवासस्थान, ग्रुपच्या कंपन्या, जेटच्या संचालकांची कार्यालये यांची झडती घेण्यात आली होती. ईडीमधील सूत्राच्या माहितीनुसार १९ विविध कंपन्यांवर गोयल यांचे नियंत्रण आहे. त्यापैकी ५ कंपन्या विदेशात आहेत. गोयल यांनी कंपन्यांच्या माध्यमातून संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचा ई़डीचा दावा आहे. तसेच कंपन्यांचा झालेला खर्च हा बनावट असून खूप मोठा तोटा झाल्याचे भासविण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे.

Leave a Comment