विनायकी देवी आहे गजाननाचे स्त्री रूप

vinayaki
सध्या देशभर गणेशोत्सवाची धूमधाम सुरु झाली असून आता लवकरच बाप्पांना निरोप देण्याची वेळ येत आहे. देशभरात तसेच परदेशातही अनेक ठिकाणी गणेशाची मंदिरे आहेत त्यातील काही खासही आहेत. प्राचीन काळापासून पुजल्या जात असलेल्या गणेशाची स्त्री रूप मात्र फारसे परिचित नाही. तरी भारतात कशी, ओरिसा, तामिळनाडू येथे स्त्री गणेशाची मंदिरे असून गणेशाच्या या रुपाची विनायकी देवी म्हणून पूजा केली जाते.

पुराण काळात विष्णू, इंद्र, अर्जुन यानाही कधी न कधी स्त्री रूप धारण करावे लागल्याचे उल्लेख येतात. तसेच गणेशाचे विनायकी हे स्त्रीरूप असून त्याला गाजनानी, विघ्नेशी, गजरूपा अशीही नावे आहेत. यात या देवीच्या हातात परशु आणि कुऱ्हाड अशी शत्रे दिसतात. वाराणसी, तमिळनाडूतील चिदंबरम, ओदिसातील राणीपूर, जबलपूर येथील ६४ योगिनी मंदिरात विनायकी देवीची मूर्ती पाहायला मिळते. मिळालेल्या माहितीनुसार विनायकी देवीची सर्वात प्राचीन मूर्ती राजस्तानात सापडली होती. टेराकोटाची हि मूर्ती २१०० वर्षे जुनी आहे असे सांगितले जाते.

Leave a Comment