पाकिस्तानचा डान्सिंग बोलर अब्दुल कादिर यांचे निधन


खतरनाक टॉप स्पिन टाकत असताना विशिष्ट हालचालीमुळे डान्सिंग बोलर अशी प्रसिद्धी मिळालेला पाकिस्तानचा लेग स्पिनर अब्दुल कादिर यांचे शुक्रवारी हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने त्याच्या अधिकृत ट्विटर अकौंटवर ही बातमी दिली असून कादिर यांचे निधन हा मोठा धक्का असल्याचे सांगत शोक व्यक्त केला आहे.


कादिर यांचा जन्म १९५५ साली लाहोर येथे झाला होता. तत्कालीन क्रिकेट खेळाडू मध्ये त्यांचा परीचय सर्वश्रेष्ठ लेग स्पिनर असा होता. टॉप स्पिनबॉल गुगली भासावा या प्रकारे टाकण्यात त्याची ख्याती होती. त्यांच्या बोलिंग अॅक्शन मुळे त्याला डान्सिंग बॉलर अशी उपाधी मिळाली होती. पाकिस्तान साठी त्यांनी ६७ टेस्ट मध्ये २३६ विकेट घेतल्या आहेत. १०४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्यांच्या नावावर १३२ विकेट आहेत.

लाहोर तेथे १९८७ मध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामन्यात त्यांनी एका पारित ५६ धावा देऊन ९ विकेट घेतल्या होत्या. पाकिस्तान क्रिकेट इतिहासात आजही हे रेकॉर्ड कायम आहे. कादिर १९८३ आणि १९८७ सालचे दोन वर्ल्ड कप पाकिस्तान तर्फे खेळले होते.

Leave a Comment