खेकडेच खेकडे चोहीकडे


जगाच्या पाठीवर कोणत्याही जागी किडे, कीटक दिसणे हे आम दृश्य आहे. पण एखाद्या जागी पाहाल तेथे नुसते लाल रंगाचे खेकडे दिसतील अशी कल्पना तुम्ही कधी केली नसेल. ऑस्ट्रेलियाच्या क्रिसमस बेटावर हे दृश्य तुम्ही पाहू शकता आणि ते पाहण्यासाठी ठराविक काळात अनेक पर्यटक येथे येतातही. हे बेट ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड मध्ये आहे.

वर्षाच्या एका ठराविक काळात येथे घरे, रेस्टॉरंट, बार, बसस्टॉप रस्ते असे पाहाल तेथे पावसात गारा पडाव्या तसे खेकडे दिसतात. कोट्यावधींच्या संख्येने दिसणाऱ्या या खेकड्यांमुळे रस्ते लाल दिसतात आणि जागोजागी येथे वाहने चालविण्यास मज्जाव आहे अश्या पाट्या झळकू लागतात. तरीही अनेक खेकडे वाहनाखाली चिरडले जातात.


क्रिसमस बेटाच्या एका टोकावर असलेल्या जंगलातून प्रजनन काळात हे खेकडे दुसऱ्या टोकाला असलेल्या हिंद महासागराच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरु करतात आणि याच काळात खेकडेच खेकडे चोहीकडे असे दृश्य दिसते. रस्त्यांवर लाल रंगाचे बोर्ड लावले जातात. ५२ चौरस मैलाचा परीघ असलेले हे बेट एरवी शांत असते कारण या बेटावर फक्त २ हजार लोक राहतात. खेकडे पाहण्यासाठी मात्र पर्यटक मोठ्या संख्येने येतात तेव्हा येथे वर्दळ वाढते.

Leave a Comment