48 मेगापिक्सल कॅमेरा असणारा विवोचा स्मार्टफोन लाँच


वीवोने आपल्या झेड सिरीजमधील विवो झेड1एक्स स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा फोन वीवो झेड1 चे अपग्रेटेड व्हर्जन आहे. विवो झेड1 एक्समध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. या फोनमध्ये सी टाइप चार्जिंग देण्यात आली आहे.

या फोनमध्ये 6.3 इंचचा सुपर एमोलेड डिसप्ले आहे. फोनच्या मागील पॅनलवर ग्लास देण्यात आली आहे. फोनच्या डाव्या बाजूला गुगल असिस्टेंट बटन आणि सिम कार्ड ट्रे देण्यात आला आहे. याचबरोबर 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि स्पिकर ग्रिल खालील बाजूला देण्यात आले आहे.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यामध्ये तीन रिअर कॅमेरे देण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स 582 सेंसर आहे. दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सल वाइड एँगल आणि तिसरा 2 मेगापिक्सल आहे. यामध्ये 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळेल.

हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये मिळेल. ज्यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंत स्टोरेज आणि दुसरा 6 जीबी रॅम आणि 64 जीबी पर्यंत स्टोरेज या व्हेरिएंटचा समावेश आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रँगन 712 प्रोसेसर मिळेल.

याशिवाय फोनमध्ये 4500 एमएएचची बॅटरी असून, 22.5 वॉट वीवो फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीचा दावा आहे की, 30 मिनिटात फोन 50 टक्के चार्ज होईल. याचबरोबर यामध्ये सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक देखील देण्यात आले आहे. गेमिंगसाठी अल्ट्रा गेमिंग मोड देखील आहे.

या फोनची विक्री 13 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरू होईल. 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज फोनची किंमत 16,990 रूपये आहे तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंत स्टोरेज फोनची किंमत 18,990 रूपये आहे.